आदर्श विद्या मंदिर व कनिष्ठ महाविद्यालय निजामपूर जैताणे

निजामपुर जैताणे हे गाव ग्रामीण भागातील वसलेले आहे. आजच्या 62 वर्षांपूर्वी या भागात शिक्षणाची कोणतीही सोय नव्हती आपल्या ग्रामीण भागातील मुला-मुलींना शिक्षणाची संधी प्राप्त व्हावी हा उदात्त दृष्टिकोन ठेवून कै. विष्णुदास रामदास शाह व कै. जगन्नाथ कडवादास शाह यांनी गावातील शिक्षणप्रेमी व्यक्तींना एकत्रित करून गावात शाळा सुरू करण्याचे ठरवले 21 जून 1957 रोजी निजामपूर जैताणे शिक्षण प्रसारक मंडळ संचलित आदर्श विद्यामंदिर ची स्थापना केली संस्थेचे बोधवाक्य तमसो मा ज्योतिर्गमय हे ठरविले याचा अर्थ अंधाराकडून प्रकाशाकडे अर्थात अज्ञानाकडून ज्ञानाकडे नेण्याची वाटचाल सुरू केली. 1957 साली 90 विद्यार्थी संख्याने शाळेचा विकास सुरू केला. शाळेला जागेची कमतरता जाणवू लागली तेव्हा जैताणे ग्रामपंचायतीने पाच एकर जागा दिली त्या वेळेच्या संचालक मंडळाने मोठ्या देणग्या देऊन वर्ग खोल्या बांधल्या निस्वार्थ भावनेने स्थापन केलेली संस्था आज प्रगतीपथावर जाऊन पोहोचली आहे.

संस्थेने सुरुवातीस केवळ माध्यमिक विभाग सुरू केला नंतर कनिष्ठ महाविद्यालयाची भर टाकण्यात आली 1995 साली आदर्श कला महाविद्यालयाची स्थापना करून या ग्रामीण भागात उच्च शिक्षणाची सोय करून दिली नंतर 2003 साली आदर्श प्राथमिक विद्यामंदिर सुरू केले बदलत्या काळानुसार इंग्रजी माध्यमाची सुद्धा सोय 2012 साली करण्यात आली.

आज संस्थेचे पूर्वप्राथमिक, प्राथमिक ,इंग्लिश मीडियम, माध्यमिक विभाग व उच्च माध्यमिक विभाग किमान कौशल्य, टेक्निकल, वरिष्ठ महाविद्यालय हे विभाग सुरू आहेत संस्थेचे संकुल भव्य व अनेक सोयींनी सुसज्ज आहे आज संस्थेत सुसज्ज प्रयोगशाळा कार्यशाळा ग्रंथालयाची भव्य वास्तू, संगणक कक्ष, टेक्निकल दालन, सुसज्ज क्रीडा विभाग, संगणीकरणानेयुक्त आधुनिक कार्यालय, सीसीटीव्ही कॅमेरे, भव्य पटांगण, एनसीसी विभाग, स्काऊट गाईड विभाग, विद्यार्थ्यांसाठी व विद्यार्थिनी साठी स्वतंत्र प्रसाधनगृह, विद्यार्थी वाचन कक्ष, शिक्षक दालन, वाहनतळ व अगदी आधुनिकते प्रमाणे शिक्षण देण्यासाठी सुसज्ज डिजिटल लॅब या सर्व सोयी संस्थेने करून दिल्या आहेत.

 गेल्या अनेक वर्षापासून एसएससी एचएससी च्या उत्कृष्ट निकालाची परंपरा यावर्षी कायम राखली आहे यावर्षी एसएससी ला 331 विद्यार्थी परीक्षेस बसले होते त्यापैकी डिस्टिंक्शन मध्ये 80 विद्यार्थी फर्स्टक्लास 140 विद्यार्थी एकूण 290 विद्यार्थी उत्तीर्ण झाले शाळेचा निकाल 87.87% प्रथम क्रमांक कुमारी दिपाली सुरेश शिरोळे 90.8 टक्के द्वितीय क्रमांक कुमारी रश्मी प्रदीप वाणी 90.40% तृतीय क्रमांक कुमारी प्रांजली प्रमोद राणे 89.80

          इयत्ता बारावी मध्ये 375 विद्यार्थी परीक्षेला बसले 356 विद्यार्थी उत्तीर्ण 94.3 93 कला शाखेत 126 पैकी 110 विद्यार्थी पास झाले. प्रथम क्रमांक कारंडे पवन अर्जुन 80.15 टक्के किमान शाखेत 188 पैकी 185 विद्यार्थी पास झालेत प्रथम क्रमांक ठाकरे ऋषिकेश रामदास 82.76 % वाणिज्य शाखेत 61 पैकी 61 विद्यार्थी पास झालेत प्रथम क्रमांक कुमारी जाधव मोनाली संभाजी 79.07 तसेच विविध स्पर्धात्मक शासकीय परीक्षांमध्ये शाळेचा मोठा सहभाग असतो त्यात एन. एम. एम. एस. परीक्षा, स्कॉलरशिप परीक्षा, संगीत परीक्षा,चित्रकला परीक्षा, यामध्ये शाळेला दरवर्षी चांगले यश मिळते तसेच तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात दरवर्षी शाळेला पारितोषिक प्राप्त होतो जिल्हा स्तरापर्यंत विद्यार्थी तसेच शालेय शिक्षणाबरोबर सहशालेय उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व सुसंस्कार रुजवण्यासाठी महापुरुषांची जयंती पुण्यतिथी, साने गुरुजी,कथामाला, निबंध लेखन, कथालेखन स्पर्धा, वक्तृत्व, वादविवाद स्पर्धा, चित्रकला, हस्ताक्षर, सामान्यज्ञान स्पर्धा, प्रश्नमंजुषा, रांगोळी स्पर्धा, वर्ग सजावट स्पर्धा घेतल्या जातात तसेच सहलीचे नियोजन करून ऐतिहासिक व पर्यावरणीय ज्ञानात भर टाकली जाते स्नेह संमेलनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो तसेच दरवर्षी आदर्श विद्यार्थ्यांची निवड करून आदर्श विद्यार्थी पुरस्कार दिला जातो तसेच स्वातंत्र्य दिन प्रजासत्ताक दिन या दिवशी विविध लोककला लोकनृत्य टिपरी लेझीम नाटिका यांचे आयोजन करून संस्कृती जोपासण्याचे कार्य ही केले जाते तसेच मागील वर्षी शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक विद्यार्थी जिल्हास्तर विभागीय स्तर राज्यस्तर तसेच राष्ट्रीय पातळीपर्यंत यशस्वी झालेत चित्रकला परीक्षेच्या माध्यमातून या वर्षी इयत्ता दहावी मध्ये 60 विद्यार्थ्यांना वाली गुणांचा लाभ झाला.

  तसेच दरवर्षी वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन तसेच स्वच्छता अभियान असे उपक्रम घेतले जातात इयत्ता दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शाळेतच अभ्यासिका वर्गाची ही व्यवस्था करण्यात आली इयत्ता अकरावी बारावी साठी संगणक इलेक्ट्रॉनिक यासारखे विनाअनुदानित वर्ग संस्थेने सुरू केले आहेत. संस्थेने विद्यार्थी विकास मंचाची स्थापना केली आहे या माध्यमातून विविध यशस्वी व्यक्तींचे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले जाते. आपल्या संस्थेचे अनेक माजी विद्यार्थी आज विविध क्षेत्रांमध्ये आपल्या शिक्षणाची छाप पाडीत आहेत आयटी क्षेत्रात वैद्यकीय क्षेत्रात बँकींग पोलीस क्षेत्रात आपल्या शाळेचे नाव उज्वल करीत आहेत तसेच ऋण म्हणून अनेक माजी विद्यार्थी शाळेला वेळोवेळी देणग्या पाठवीत असतात अनेक विद्यार्थी विदेशात ही आपली छाप पाडत आहेत आज आपल्या आदर्श संकुलांमध्ये चार हजार पेक्षा जास्त विद्यार्थी शिक्षण घेत आहेत संस्थापक संचालक मंडळापासून निस्वार्थ भावनेची प्रेरणा घेऊन वर्तमान संचालक मंडळानेही शिक्षणाचे बाजारीकरण होऊ दिले नाही हे विशेष उल्लेखनीय आहे.

 श्री. राजेश शहा

(आदर्श विद्या मंदिर निजामपूर जैताणे)